|
मुंबई – गोमांसाने भरलेला टेंपो नागपाडा येथे आढळल्याप्रकरणी रियाज अहमद साकीर अहमद खान आणि परवेझ अहमद साकीर अहमद खान यांना अटक करण्यात आली. टेंपोचे मालक अन् चालक यांचा शोध पोलीस घेत आहेत. गोमांसाचे वजन साधारणतः २०० किलो होते. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाविषयी तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यासाठी विश्व हिंदु परिषदेचे मुंबई शहर विभाग मंत्री राजीव चौबे गेले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनात बैठक चालू असल्याने चौबे यांनी स्थानकाच्या बाहेर गोतस्करीविरोधात घोषणा दिल्या. त्याच वेळी एका अज्ञाताने ५० ते ६० जणांचा जमाव एकत्र करत गोतस्करीच्या समर्थनार्थ घोषणा देत दगडफेक केली. या प्रकरणी अज्ञाताविरूद्ध गुन्हे नोंदवण्यात आला आहे. (दगडफेक करणार्यांना कारागृहातच डांबायला हवे ! – संपादक)
🚨 VHP Leader Attacked in Mumbai for Opposing Cow Smuggling! 🚨
🔴 Mob of 50-60 pelted stones at VHP Mumbai leader for protesting cow smuggling!
2 arrested for transporting beef.
Shocking! Despite the Cow Slaughter Ban, those opposing smuggling are attacked! pic.twitter.com/hauv7BoUJR
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 28, 2025
संपादकीय भूमिकागोवंशहत्याबंदी कायदा अस्तित्वात असतांना गोतस्करीला विरोध करणार्यांवर आक्रमण होणे संतापजनक ! |