WB Murshidabad Violance : मुर्शिदाबाद (बंगाल) येथे ४०० हून अधिक हिंदूंचे पलायन !

  • आतापर्यंत ३ हिंदूंची हत्या

  • घरे, दुकाने लुटण्यात आणि जाळण्यात आल्याने हिंदूंनी शाळांमध्ये घेतला आश्रय

घाबरलेल्या हिंदूंनी इतरत्र घेतलेला आश्रय !

मुर्शिदाबाद (बंगाल) : येथे धर्मांध मुसलमानांनी वक्फ सुधारणा कायद्यावरून गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार चालू केला आहे. यात आतापर्यंत ३ हिंदूंना ठार करण्यात आले, ते अनेक हिंदूंची घरे, दुकाने लुटण्यात आली आणि त्यांची जाळपोळ करण्यात आली. यामुळे घाबरलेल्या ४०० हून अधिक हिंदूंनी तेथून पलायन केले आहे, तर अनेकांनी दुसर्‍या गावातील शाळांमध्ये आश्रय घेतला आहे. सध्या कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीमा सुरक्षा दलाचे सैनिक, तसेच १ सहस्र पोलीस तैनात करण्यात आले आहेत. यासह मोठे अधिकारी येथे तैनात आहेत. (उच्च न्यायालयाला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आदेश द्यावे लागतात, हे राज्य सरकारला लज्जास्पदच होय ! – संपादक)

नदी पार करून हिंदूंचे पलायन ! – भाजप

भाजपचे आमदार आणि राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी आरोप केला की, धर्मांधांच्या भीतीमुळे मुर्शिदाबाद जिल्ह्यातील धुलियन क्षेत्रामधून ४०० हून अधिक हिंदूंना त्यांची घरे सोडून पलायन करण्यास भाग पाडण्यात आले आहे.

या हिंदूंनी नदी पार करून मालदा जिल्ह्यातील बैष्णवनगर येथील देओनापूर-सोवापूर ग्रामपंचायत क्षेत्रामधील लालपूर हायस्कूलमध्ये आश्रय घेतला आहे. तृणमूल काँग्रेसच्या लांगूलचालनाच्या राजकारणामुळे कट्टरतावादी शक्तींना प्रोत्साहन मिळाले आहे. यामुळे हिंदूंना आता त्यांच्याच भूमीत असुरक्षित वाटत आहे. हे कायदा आणि सुव्यवस्थेचे पूर्णपणे अपयश आहे.

पीडित हिंदूंनी सांगितली धर्मांध मुसलमानांच्या आक्रमणांची माहिती !

१. व्यापारी अमर भगत यांच्या पत्नी मंजू भगत यांनी सांगितले, ‘धर्मांधांच्या जमावाने प्रथम आमच्या घराचा पुढचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्यांना तो तोडता आला नाही, तेव्हा त्यांनी मागच्या दाराने आत प्रवेश करण्यास चालू केले. त्यांनी आमची दुचाकी फोडली, घरात घुसले आणि खुर्च्या, गाद्या, टीव्ही, महागड्या वस्तू सर्वकाही लुटले. आमचे संपूर्ण कुटुंब देवाचे नाव घेत होते. आम्ही आमचे जीव वाचवण्यासाठी छतावर लपलो होतो. मी विचार करत होते, जर माझ्या मुलीवर धर्मांधांनी बलात्कार केला तर ?’

२. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, मुसलमानांनी रुग्णवाहिका पेटवून दिली. चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. भीतीमुळे आम्हाला घरात कोंडून ठेवण्यात आले. मी माझे आई-वडील, पत्नी आणि मुले यांना घरातच ठेवले. मुसलमान बाहेरचे नसून स्थानिक होते.

३. अन्य एका पीडितेने ए.एन्.आय. (एशियन न्यूज इंटरनॅशनल) वृत्तसंस्थेला सांगितले, ‘मुसलमानांनी दुचाकी फोडल्या, दुकाने जाळली आणि आमचे सामान लुटले. आम्ही भीतीने रात्रभर जागे राहिलो. पोलीस कुठेच दिसत नव्हते. ते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत होते. आता आपण पाहूया सरकार आपल्याला काही भरपाई देते कि नाही ?’

४. सुती येथील एका हिंदु दांपत्याच्या मालकीचे ‘सुभा स्मृती हॉटेल’ हे मिठाईचे दुकान मुसलमानांच्या आक्रमणात पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. दुकान मालक रडत म्हणाले, ‘सर्व काही लुटले गेले. दुकानात ठेवलेली रोख रक्कम, सामान, काहीही शिल्लक राहिले नाही. आम्ही सर्वस्व गमावले आहे. आता आम्ही काय खाणार ?’

संपादकीय भूमिका

दुसरा बांगलादेश झालेला बंगाल ! याचे सुवेरसुतक देशातील राजकीय पक्ष आणि संघटना यांना नाही ! जे आज बंगालमध्ये घडत आहे, उद्या देशातील बहुतेक भागांत घडू लागल्यावर हिंदू कुठे पळून जाणार आहेत ?