TMC MP Bapi Halder’s Threat : (म्हणे) ‘जर तुम्ही वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवर डोळा ठेवला, तर आम्ही तुमचे डोळे काढू !’

तृणमूल काँग्रेसचे खासदार बापी हलदर यांची धमकी

तृणमूल काँग्रेसचे खासदार बापी हलदर

कोलकाता / नवी देहली – वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवर मुसलमानांचा अधिकार आहे. जर कुणी या मालमत्तांवर डोळा ठेवला, तर त्याचे डोळे काढून टाकले जातील. तसेच त्याचे हात आणि पायही मोडले जातील, अशी धमकी बंगालमधील मथुरापूर मतदारसंघाचे तृणमूल काँग्रेसचे खासदार बापी हलदर यांनी एका सभेत दिली. ‘राज्यातील वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचे संरक्षण करणे, हे माझे आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे दायित्व आहे’, असेही त्यांनी सांगितले.

‘जमियत उलेमा-ए-हिंद’ने विधान ठरवले चुकीचे !

जमियत उलेमा-ए-हिंदचे सचिव मौलाना नियाज फारुकी यांनी खासदार हलदर यांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, त्यांनी योग्य भाषा वापरली पाहिजे. डोळे काढण्याचा अर्थ काय ? कुणालाही असे करण्याचा अधिकार नाही. जर त्यांनी असे म्हटले असेल, तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. बंगालच्या मुर्शिदाबाद येथे वक्फ कायद्याच्या विरोधात झालेल्या हिंसाचारासाठी तेथील सरकार उत्तरदायी आहे. जर कुठेही निषेध होत असेल, तर तो शांततापूर्ण होऊ देण्याचे दायित्व सरकारचे आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचेही दायित्व आहे. या कारणास्तव तिथे केंद्रीय सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत.

संपादकीय भूमिका

  • ज्या राज्यात सत्ताधारी पक्षाचे खासदार सार्वजनिक कार्यक्रमात अशी उघड धमकी देत असतील, तर राज्यात हिंसाचार होणार नाही, तर दुसरे काय होणार ?
  • देशाची राज्यघटना सतत हातात घेऊन त्याच्या रक्षणाचे दायित्व असल्याचे जनतेला सांगणारे ढोंगी राजकीय पक्ष याविषयी तोंड का उघडत नाहीत ? कि ‘राज्यघटनेनेच तृणमूल काँग्रेसला अशा प्रकारचा हिंसाचार करण्याची अनुमती दिली आहे’, असे त्यांना म्हणायचे आहे ?