
सिलिगुडी (बंगाल) – विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री. मिलिंद परांडे यांनी बंगालमध्ये शांतता, सुव्यवस्था आणि कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्याचे, तसेच वक्फ कायद्याच्या निषेधाच्या नावाखाली हिंदूंवर होणारी जिहादी आक्रमण तातडीने थांबवण्याचे आवाहन केले. पोयला वैशाख आणि शुभो नववर्ष १४३२ बंगाबदनिमित्त सिलिगुडी महानगरातील नागरिक आणि बंगालमधील सर्व जनता यांना शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी हे आवाहन केले.
१. विश्व हिंदु परिषदेच्या सिलिगुडी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलतांना श्री. परांडे म्हणाले की, बंगालचे मंत्री सिद्दीकुल्लाह चौधरी यांचे प्रक्षोभक विधान निषेधार्ह आहे. मुर्शिदाबादमध्ये हिंदूंवर झालेल्या जिहादी आक्रमणात मृत्यूमुखी पडलेल्या हरगोविंद दास आणि चंदन दास यांच्या कुटुंबियांना योग्य भरपाई देण्यात यावी, तसेच दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी. स्वतःच्या राज्यात निर्वासित होण्यास भाग पाडलेल्या आणि मुर्शिदाबादहून मालदा येथे आश्रय घेतलेल्या बंगाली हिंदूंचे त्वरित पुनर्वसन करावे. बंगालमधील ही घटना काश्मीरमध्ये घडलेल्या घटनांची अचूक पुनरावृत्ती आहे, असे ते म्हणाले. (मुर्शिदाबादमध्ये हिंदूंना निर्वासित होण्याची परिस्थिती उद्भवणे, हे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद ! – संपादक)
२. श्री मिलिंद परांडे पुढे म्हणाले की, बंगालचे राज्यमंत्री फिरहाद हकीम यांनी हिंदूंना त्यांच्याच राज्यात निर्वासित होण्याविषयी केलेले विधान अत्यंत लज्जास्पद आणि निंदनीय आहे. राज्य सरकारने सिलिगुडीमध्ये आणि बंगालमधील इतर ठिकाणी वक्फ कायद्याच्या निषेधाच्या नावाखाली कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, याची काळजी घ्यावी.
३. बंगालमध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा आणि हिंदूंच्या रक्षणासाठी केंद्रीय सुरक्षादलांना तात्काळ तैनात करावे, अशी मागणी परांडे यांनी केली.
संपादकीय भूमिकाहिंदूबहुल देशात हिंदूंवर अशी मागणी करण्याची वेळ येऊ नये, अशी परिस्थिती सरकारने स्वतःहूनच निर्माण करणे अपेक्षित आहे ! |