Hindu Activists Attacked In Karnataka : कर्नाटकात काँग्रेस सत्तेत असतांनाच हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्या होतात ! -भाजपचे आमदार आर्. अशोक

भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते आर्. अशोक यांचा घणाघात

भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते आर्. अशोक

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या काळात नेहमीच हिंदू कार्यकर्त्यांची हत्या होत आल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक कार्यकर्त्यांना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया सारख्या इस्लामी संघटनांनी ठार मारले आहे, अशी टीका भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते आर्. अशोक यांनी सरकारवर केली. ते राज्यातील जनआक्रोश यात्रेत बोलत होते. या वेळी त्यांनी राजू, राजेश कोटियन, प्रवीण पुजारी, चरण पुजारी, विश्वनाथ यांसारख्या संघाच्या अनेक कार्यकर्त्यांची नावे सांगितली. या सर्वांच्या हत्या करण्यात आल्या आहेत.

श्री. अशोक पुढे म्हणाले की,

१.  कोडागूतील विनय सोमैया या कार्यकर्त्याने छळ सहन करून आत्महत्या केली. त्यापूर्वी टीपू सुलतानच्या जयंतीच्या निमित्ताने एका वृद्धाची हत्या करण्यात आली होती. काँग्रेस सरकार हिंदूंना विभक्त करण्याचा प्रयत्न करत आहे.

२. जर मुख्यमंत्री सिद्धारामय्या सत्तेत राहिले, तर ते कर्नाटकाला पाकिस्तानकडे सोपवतील.

३. पूर्वी केवळ जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंवर आक्रमणे केली जात होती; पण सिद्धारमय्या मुख्यमंत्री राहिले, तर कोडागू हेदेखील काश्मीरसारखे होईल.

संपादकीय भूमिका

काँग्रेसचे सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट होय ! भारताला काँग्रेसमुक्त केल्याविना हिंदूंचे रक्षण होणार नाही; मात्र यासाठी हिंदू सिद्ध आहेत का ? कारण हिंदूंनीच काँग्रेसला राजकीयदृष्ट्या अद्यापपर्यंत जिवंत ठेवले आहे !