शिमला (हिमाचल प्रदेश) येथील घटना
शिमला (हिमाचल प्रदेश) – येथे देवभूमी संघर्ष समितीने आरोप केला आहे की, कालीबारी रस्त्यावर चणे आणि नमकीन विकणारा निसार अहमद हे पदार्थ विकतांना त्यात थुंकत आहे. समितीच्या कार्यकर्त्यांनी त्याला असे करतांना पाहिले आहे. तसेच अहमदकडे फेरीवाल्यांसाठीचा परवानाही नाही. त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. समितीच्या कार्यकर्त्यांनी अहमद याला परवाना दाखवायला सांगितल्यावर तो दाखवू शकला नाही. या घटनेचे समितीकडून फेसबुकवर थेट प्रक्षेपण करण्यात येत होते. यानंतर शिमलाच्या उपमहापौर उमा कौशल यांनी म्हटले की, सर्व काही चिंतेचा विषय आहे. जर आरोप खरे आढळले, तर कठोर कारवाई केली जाईल.
Action demanded against vendor Naseer Ahmed in Shimla for allegedly spitting on roasted chana before selling them!
Locals have reportedly stopped buying from such vendors. 🚫
Despite hundreds of such incidents across India,
why is there still NO national policy to deal with… pic.twitter.com/ckpkA2pTH9— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 11, 2025
देवभूमी संघर्ष समितीचे सहसंयोजक विजय शर्मा म्हणाले की, शिमलामध्ये मुसलमानांना वसवण्याचे काम बर्याच काळापासून चालू आहे. येथील मुसलमान हिंदूंना येथे काम करण्याची अनुमती देत नाहीत. एक वर्षापूर्वी फेरीवाल्यांच्या संदर्भात धोरण आणण्याची चर्चा होती; परंतु आतापर्यंत या संदर्भात कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. या संपूर्ण प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा मोठे आंदोलन केले जाईल, अशी मागणी त्यांनी केली.
संपादकीय भूमिका
|
आरोप करणार्यांनाच पुरावा सादर करण्यासाठी पोलिसांकडून नोटीस !
या घटनेनंतर पोलिसांनी ‘ज्या व्यक्तीवर चणे आणि नमकीन थुंकून विकल्याचा आरोप आहे त्याच्याविरुद्ध तुमच्याकडे काही पुरावे असतील, तर ते आम्हाला द्या. जर असे केले नाही, तर तिघांवरही कारवाई करण्यात येईल’, अशी नोटीस ३ जणांना बजावली आहे. (पुरावे शोधण्याचे काम पोलिसांचे आहे, जनतेचे नाही ! – संपादक) कल्पना शर्मा, श्वेता आणि विजय शर्मा अशी या तिघांची नावे आहेत. हे तिघेही देवभूमी संघर्ष समितीशी संबंधित आहेत.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसच्या राज्यात चोर सोडून संन्याशांना फाशी देण्याचा प्रयत्न ! |