Murshidabad Violence : मुर्शिदाबादमध्ये (बंगाल) सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवर धर्मांध मुसलमानांचा गोळीबार  

मुर्शिदाबाद (बंगाल) – येथे धर्मांध मुसलमानांनी वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात हिंसाचार केल्यानंतर कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीमा सुरक्षा दलाचे सैनिक तैनात करण्यात आले आहेत. आता त्यांच्यावरही आक्रमण केली जात असल्याचे समोर आले आहे. १२ एप्रिल या दिवशी मुर्शिदाबादमधील शमशेरगंज भागात धर्मांध मुसलमानांनी सैन्याच्या तुकडीवर दगडफेक करून पेट्रोल बाँब फेकले, तसेच त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. यानंतर १३ एप्रिलला धुलियान भागात मुसलमानांनी सैनिकांवर गोळीबार केला. या गोळीबारात २ मुले घायाळ झाली. सैनिक यात किरकोळ घायाळ झाले, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या उपमहानिरीक्षकांनी दिली. आधी हिंसाचार करणार्‍यांनीच सैनिकांवर आक्रमण केले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संपादकीय भूमिका

अशा देशद्रोह्यांना गोळ्या झाडून ठार मारण्याचाच आदेश सैन्याला दिला पाहिजेत, तरच अशांवर वचक बसेल !

(म्हणे) ‘सीमा सुरक्षा दलानेच घुसखोरांना हिंसाचार करण्यासाठी पाठवले !’ – तृणमूल काँग्रेसचा आरोप

तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष

दुसरीकडे तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनी दावा केला आहे की, सीमा सुरक्षा दलानेच हिंसाचार करण्यासाठी आणि राज्य सरकारसमोर समस्या निर्माण करण्यासाठी घुसखोरांना या भागात पाठवले. बाहेरून आलेल्या लोकांनीच हिंसाचार घडवून आणला होता आणि आता ते गायब झाले आहेत.

संपादकीय भूमिका

असा आरोप करून तृणमूल काँग्रेस भारतीय सैन्याला अपकीर्त करत आहे. या संदर्भात तृणमूल काँग्रेसने पुरावे सादर करावेत, अन्यथा क्षमा मागावी. असे केले नाही, तर तृणमूल काँग्रेसवर केंद्र सरकारने बंदी घातली पाहिजे ! तशी जनतेनेही मागणी केली पाहिजे !