Air Fare Case : विमानाच्या तिकिटांचे मूल्य निश्‍चित करण्याची मागणी करणार्‍या याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळल्या !

विमानाच्या तिकिटाचे मूल्य किती असावे ?, हे बाजारामधील परिस्थितीनुसार ठरवले जाईल. हे क्षेत्र अत्यंत चांगली कामगिरी करत आहे. तुम्ही सद्यःस्थिती पाहिली, तर हवाई क्षेत्र हे स्पर्धात्मक बनले आहे. आजकाल रिक्शाचे भाडेदेखील विमानाच्या तिकिटापेक्षा अधिक असते ! – देहली उच्च न्यायालय

‘समुद्रात उडी मारायची आहे’, असे सांगत विमानात मुसलमान प्रवाशाचे विचित्र वर्तन !

दुबई येथून मंगळुरू येथे येणार्‍या एअर इंडियाच्या विमानात महंमद बी.सी. नावाच्या प्रवाशाने विचित्र वर्तन केले. अरबी समुद्रावर पोचताच ‘मला एकट्यालाच समुद्रात उडी मारायची आहे’, असे ओरडत त्याने विमानात गोंधळ घातला.

सिंधुदुर्ग ते भाग्यनगर आठवड्यातून ३ वेळा विमानसेवा

‘फ्लाय ९१’ या विमानसेवा देणार्‍या आस्थापनाने चिपी (जिल्हा सिंधुदुर्ग) ते भाग्यनगर (हैदराबाद) विमानसेवा चालू केली आहे. आठवड्यातून ३ वेळा ही सेवा उपलब्ध असणार आहे.

Action Against Gold Smugglers : मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांची सोन्याची तस्करी करणार्‍यांवर कारवाई !

विमानतळावर वारंवार होणारी सोन्याची तस्करी रोखण्यासाठी आरोपींना कठोर शिक्षा करणे आवश्यक !

जैसलमेर (राजस्थान) येथील वाळवंटात ‘तेजस’ हे लढाऊ विमान कोसळले !

जैसलमेर येथील वाळवंटात भारताचे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे ‘तेजस’ हे लढाऊ विमान कोसळले. यातील दोन्ही वैमानिक सुखरूप आहेत. हे लढाऊ विमान पडल्यानंतर त्याला आग लागली. यात २ वैमानिक होते.

पुणे विमानतळावर प्रवाशांची गैरसोय !

टर्मिनलची प्रवासी वहनक्षमता वर्षाला सुमारे ७१ लाख इतकी आहे; मात्र वर्ष २०२३ मध्ये ८० लाखांहून अधिक प्रवासी वाहतूक झाली. क्षमतेपेक्षा २८ टक्के अधिक प्रवासी वाहतूक होत असल्याने त्याचा प्रवासी सुविधांवर परिणाम होत आहे.

Indian Women Pilots : भारतात महिला वैमानिकांची टक्केवारी सर्वाधिक !

भारतात महिला वैमानिकांची संख्या जागतिक सरासरीपेक्षा जवळपास तिप्पट ! ‘हिंदु धर्म स्त्रियांना तुच्छ लेखतो. त्यांना अधिकार नाकारतो’, अशी जी आरोळी तथाकथित पुरोगामी देशांकडून वारंवार ठोकली जाते, त्यांना आता या आकडेवारीवर काय म्हणायचे आहे ?

विमानात आसनाखाली बाँब असल्याची खोटी माहिती देणार्‍या मुसलमानाच्या विरोधात गुन्हा नोंद !

अल्पसंख्य असणारे मुसलमान गुन्हेगारीत बहुसंख्य !

मालदीवच्या राष्ट्रपतींच्या भारतद्वेषामुळे त्यांच्या देशातील १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू !

मालदीव आणि भारत यांच्यातील तणावामुळे मालदीवच्या एका १४ वर्षांच्या मुलाचा नाहक मृत्यू झाला. याला मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू उत्तरदायी आहेत. या मुलाला ब्रेन ट्युमर होता.