पुणे – येथील लोहगाव विमानतळावरील नव्याने उभारण्यात आलेले टर्मिनल १४ जुलै या दिवशी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत प्रवाशांच्या सेवेसाठी खुले करण्यात आले आहे. नव्या टर्मिनलवरून विमानप्रवास करणार्या पहिल्या प्रवाशाला या वेळी मोहोळ यांच्या हस्ते प्रवासाचे तिकीट देण्यात आले.
‘पुणे येथील टर्मिनलमुळे वर्षाला सुमारे ९० लाख ते १ कोटी प्रवाशांची सुलभ वाहतूक करणे शक्य होणार असून प्रत्येक पुणेकराला अभिमान वाटेल अशी वास्तू या निमित्ताने उभी राहिली’, असे मोहोळ यांनी सांगितले.