Brazil Plane Crash : ब्राझिलमध्‍ये झालेल्‍या विमान अपघातात सर्व ६२ लोकांचा मृत्‍यू !

ब्राझिलिया (ब्राझिल) – येथील विन्‍हेडो प्रांतात मोठी विमान दुर्घटना घडली असून त्‍यात असलेल्‍या सर्व ६२ जणांचा मृत्‍यू झाला आहे. स्‍थानिक वेळेनुसार ९ ऑगस्‍टच्‍या दुपारी १.४५ वाजता हा अपघात झाला. यात ५८ प्रवासी यांच्‍यासह वैमानिक आणि ३ कर्मचारी असे ६२ जण प्रवास करत होते. स्‍थानिक वृत्तवाहिनी ‘ग्‍लोबोन्‍यूज’ने या घटनेची माहिती दिली.

१. ‘व्‍होपास लिन्‍हास एरिआज’ नावाच्‍या आस्‍थापनाचे ‘ए.टी.आर्. – ७२’ हे विमान पराना राज्‍यातील कास्‍केवेल शहरातून साओ पाऊलोमधील ग्‍वारुलहोसला जात होते.

२. विमान आस्‍थापनाने या अपघाताविषयी निवेदन प्रसारित केले आसून त्‍यात ही विमान दुर्घटना कशामुळे झाली, ते अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही, असे म्‍हटले आहे.

३. प्रत्‍यक्षदर्शींनी सांगितले की, ज्‍या ठिकाणी विमान कोसळले, तेथून आगीचे मोठे लोळ दिसत होते. विमान कोसळल्‍यानंतर एका मोठ्या स्‍फोटाचा आवाजही आला होता.

४. दक्षिण ब्राझिलमधील एका कार्यक्रमात ब्राझिलचे अध्‍यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्‍वा यांनी या अपघाताचे वृत्त सांगत शोक व्‍यक्‍त केला.