(म्‍हणे) ‘वर्ष १९८५ च्‍या एअर इंडिया कनिष्‍क बाँबस्‍फोटाची चौकशी चालूच !’

कॅनडासारख्‍या प्रगत देशात ३९ वर्षांपूर्वीच्‍या बाँबस्‍फोटाची चौकशी अजूनही चालू असणे, हे लज्‍जास्‍पदच होय !

Blade In Food Air India : एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा !

प्रवाशांच्या आरोग्याविषयी निष्काळजी असणार्‍या वाहतूक आस्थापनांकडून दंड वसूल केला पाहिजे !

२ विमानांची धडक थोडक्यात टळली !

दोन विमानांची धडक झाली असती, तर अनर्थ घडला असता ! हे पहाता विमानतळ प्रशासनाने संबंधित कर्मचारी योग्य प्रकारे कर्तव्य बजावतात का ? हे पहायला हवे !

कंगना रणौत यांना विमानतळावर महिला शिपायाने थोबाडीत मारली !

देहलीत शेतकर्‍यांच्या झालेल्या आंदोलनावर कंगणा रनौत यांनी टीका केली होती. या टिकेमुळेच त्यांना मारहाण केल्याचे या महिला शिपायाने सांगितल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

IAF MiG Plane Crashes : नाशिक येथे भारतीय वायूदलाच्या मिग विमानाचा भीषण अपघात !

भारतीय वायूदलाचे मिग विमान ४ जूनला येथील पिंपळगावजवळ शिरसगाव परिसरात कोसळले. हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या दुर्घटनेत सुदैवाने वैमानिक बचावले आहेत.

China Deploys fighter Jets : चीनने सिक्किमजवळील सीमेवर पुन्हा तैनात केली अत्याधुनिक लढाऊ विमाने !

चीन विश्‍वासघातकी आणि धूर्त असल्याने त्याच्याकडून अशी कृती होणे अनपेक्षित नाही. चीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारताने सदैव सतर्क रहाणेच आवश्यक आहे !

India Buy 26 Rafale Jets : भारत फ्रान्सकडून घेणार आणखी २६ राफेल लढाऊ विमाने !

भारत सरकार पुन्हा एकदा फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमाने विकत घेणार आहे. त्यासाठीच्या कराराची बोलणी याच आठवड्यात चालू होणार आहे. भारतीय नौदलासाठी २६ राफेल लाढाऊ विमाने विकत घ्यायची आहेत.

US F-35 Jet Crashes : अमेरिकेचे ‘एफ्‘-३५’ हे प्रगत लढाऊ विमान कोसळले !

अमेरिकेचे अत्यंत प्रगत आणि शक्तिशाली लढाऊ विमान ‘एफ्-३५’  न्यू मेक्सिकोमधील अल्बुकर्क विमानतळावर नुकतेच कोसळले. या अपघातात वैमानिक घायाळ झाला असून उपचारांसाठी त्याला ‘युनिव्हर्सिटी ऑफ न्यू मेक्सिको’च्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

खराब हवामानामुळे ‘सिंगापूर एअरलाइन्स’मधील एका प्रवाशाचा मृत्यू, अनेक घायाळ !

सिंगापूर एअरलाइन्सचे विमान लंडनहून सिंगापूरकडे जात असतांना अचानक खराब हवामानाचा सामना करावा लागल्याने विमानाने अनेक हेलकावे खालले. त्यामुळे अनेक प्रवासी घायाळ झाले असून एका ७७ वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.

Iran President Accidental Death : इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा हेलिकॉप्टरच्या अपघातात मृत्यू

इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा १९ मे या दिवशी अझरबैझान देशाच्या सीमेवरील जोल्फा शहराजवळ हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात मृत्यू  झाला. त्यांच्यासमवेत परराष्ट्रमंत्र्यांसह एकूण ९ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.