पुणे येथे मंदिर महासंघाच्या वतीने करण्यात आलेल्या सामूहिक गुढीपूजनाला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु नववर्षाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंदु संस्कृतीचे जतन आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने सामूहिक गुढी उभारण्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कर्नाटक : मुसलमानांनी पंचगणाधीश्वर कोलशांतेश्वर मठाच्या स्वामीजींना कुराण भेट देऊन दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !

कर्नाटकच्या विजयनगर जिल्ह्यातील हरपनहळ्ळी  येथील पंचगणाधीश्वर कोलशांतेश्वर मठाच्या स्वामीजींना मुसलमान नेत्यांनी कुराण ग्रंथ भेट देऊन गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या ( १ एप्रिल २०२५ )

सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत ३ किलो गांजासह महंमद शरीफ या आरोपीला अटक करण्यात आली. जप्त केलेल्या हायड्रोपोनिक गांजाची किंमत तीन कोटी रुपये आहे.

‘हिंदु धर्म आणि मंदिर’ यांच्याशी निगडीत विषयांवर कथा स्पर्धा पार पडली !

‘विश्व हिंदू परिषद – मंदिर मठ आयाम’ने ‘हिंदु धर्म आणि मंदिर’ यांच्याशी निगडीत विषयावर एक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी वरील विषयांवर ३८ कथा आल्या. स्पर्धेचा निकाल गुढीपाडव्याच्या दिवशी घोषित करण्यात आला.

मुंबईतील कलशयात्रेत २ हिंदूंना ४० ते ५० धर्मांध मुसलमानांकडून मारहाण : ४ जणांना अटक !

अल्पसंख्यांक मुसलमानांच्या हातात सत्ता नसतांनाही ते बहुसंख्य हिंदूंवर आक्रमण करतात आणि हिंदू मार खातात, हे हिंदूंना लज्जास्पद !

तळोजा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात बलीदान मास आणि मूकपदयात्रा पार पडली !

तळोजा येथील फेज २ च्या सिडको वसाहतीतील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात धर्मवीर बलीदान मासाचा शेवटचा दिवस पार पडला. रात्री ८ वाजता मूकपदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. येथील मार्गांतून प्रतिकात्मक अंत्ययात्रा निघाली.

राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती हिंदु कार्यकर्त्यांना कायदेशीरदृष्ट्या प्रशिक्षित करणार !  – पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

अकोला येथे ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’ची करण्यात आली स्थापना !

२ माजी साहाय्यक पोलीस आयुक्तांकडून अधिवक्त्यांना पुराव्यांचा पेनड्राईव्ह !

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात ३१ मार्च या दिवशी येथील २ माजी साहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिशाचे वडील सतीश सालियन यांचे अधिवक्ता नीलेश ओझा यांची भेट घेतली. त्यांना या प्रकरणाशी संबंधित अत्यंत संवेदनशील माहिती आणि पुरावे असणारा पेनड्राईव्ह दिला.

Pakistan : इस्लाम धर्म स्वीकारला नाही; म्हणून पाकिस्तानमध्ये हिंदूची हत्या

पाकमध्ये अशा प्रकारे हिंदूंचा निर्वंश केला जात आहे आणि तरीही भारत अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांकडे बारकाईने लक्ष असल्याचे सांगत आहे.  हे हिंदूंना अपेक्षित नाही !

MP Liquor Ban : मध्यप्रदेशातील १७ पवित्र शहरांमध्ये दारूबंदी लागू !

अशी बंदी देशातील सर्वच धार्मिक आणि पवित्र शहरांत घालणे आवश्यक आहे. तसेच या बंदीची कठोरपणे अंमलबजावणी करणेही तितकेच आवश्यक आहे. यासाठी प्रशासन आणि पोलीस यांनी सतर्क राहिले पाहिजे !