Pakistan : इस्लाम धर्म स्वीकारला नाही; म्हणून पाकिस्तानमध्ये हिंदूची हत्या

नदीम नाथ (सौजन्य : हिंदुस्थान पोस्ट )

पेशावर (पाकिस्तान) – येथे ५६ वर्षीय हिंदु स्वच्छता कर्मचारी नदीम नाथ यांची केवळ इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी मुश्ताक नावाच्या आरोपीला अटक केली असून त्याने हत्या केल्याची स्वीकृती दिली.

१. नदीम यांचा भाऊ सागर नाथ यांनी पोलिसांना सांगितले की, मुश्ताक गेल्या २-३ महिन्यांपासून नदीमवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणत होता. नदीमने प्रत्येक वेळी नकार दिला; पण इस्लामी कट्टरतेसमोर तो काहीही करू शकला नाही. मुश्ताकने माझ्या भावाच्या डोक्यात गोळी झाडली. तो आम्हाला चेतावणी देत असे की, ‘जर आम्ही धर्मांतर केले नाही, तर तो आम्हाला मारून टाकेल.’

२. नदीमच्या मित्रांनी सांगितले की, तो कुणाच्या तरी त्रासामुळे अस्वस्थ होता; पण घरात सर्वांत मोठा असल्याने त्याने कुटुंबातील सदस्यांना काहीही सांगितले नाही. एका कष्टाळू माणसाला केवळ हिंदु असल्यामुळे जीव गमवावा लागला.

संपादकीय भूमिका

  • पाकमध्ये अशा प्रकारे हिंदूंचा निर्वंश केला जात आहे आणि तरीही भारत अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांकडे बारकाईने लक्ष असल्याचे सांगत आहे.  हे हिंदूंना अपेक्षित नाही !
  • भारताच्या इतिहासात आतापर्यंत कधीच एखाद्याची हिंदु धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यावर हत्या झाल्याची घटना घडली नाही. यावरून हिंदु नाही, तर धर्मांध मुसलमान क्रर आहेत, हे लक्षात येते !