तळोजा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात बलीदान मास आणि मूकपदयात्रा पार पडली !

तळोजामधील सकल हिंदु समाज एकवटला !

तळोजा येथील ‘छत्रपती शिवाजी महाराज चौका’त जाऊन स्थानिक धर्मप्रेमी नागरिकांसह शिववंदना घेतली, तो क्षण !

तळोजा – येथील फेज २ च्या सिडको वसाहतीतील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात धर्मवीर बलीदान मासाचा शेवटचा दिवस पार पडला. रात्री ८ वाजता मूकपदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. येथील मार्गांतून प्रतिकात्मक अंत्ययात्रा निघाली. त्यात २०० हून अधिकांनी सहभाग नोंदवला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या आयोजकांनी ‘गुढीपाडवा उत्साहात साजरा करावा, तसेच यापुढे सप्ताहातून एकदा १ घंटा धर्मकार्यासाठी सर्वांनी चौकात एकत्र यावे’, असे आवाहन केले.

मूकपदयात्रेच्या एक दिवस आधी बलीदानमासात हिंदु जनजागृती समितीचे रायगड जिल्हा समन्वयक श्री. सुनील कदम यांनी या चौकात भेट देऊन कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी सर्व धारकर्‍यांचे कौतुक केले. धर्मकार्याचा प्रसार अजून जोमाने करण्याचे आवाहनही केले.

तळोजा येथील फेज ३ च्या चौकाचे नामकरण अलीकडेच ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ असे केल्याने स्थानिक धर्मप्रेमी नागरिकांसह येथे शिववंदना घेण्यात आली. शिव-शंभू कार्यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.