
मुंबई – मालाड (पूर्व) येथील पठाणवाडीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त काढलेल्या कलशयात्रेच्या वेळी भगवा झेंडा घेतलेल्या २ हिंदु तरुणांना ४० ते ५० मुसलमानांनी मारहाण केली. या प्रकरणी बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. यानंतर ४ जणांना अटक करण्यात आली आहे. येथे २ हिंदूंचा मुसलमानांसमवेत वाद झाला. या वेळी त्या युवकांना मारहाण करण्यात आली. त्याचा व्हिडिओही प्रसारित झाला आहे. धर्मांधांनी हिंदूंच्या हातातील भगवा झेंडा खेचण्याचाही या वेळी प्रयत्न केला.
🚨 Mob Attack Near Mosque in Malad? 🚨
🔥 On Gudi Padwa, two youths carrying the Bhagwa Dwaj were attacked, and the sacred flag was vandalized near a mosque in Malad.
⚠️ Why is Hindu symbolism always under attack? 🤔
🛡️ Time to unite and defend Dharma! A Hindu Rashtra is the… pic.twitter.com/LID0xlhWTA
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 31, 2025
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे ‘मॉब लिचिंग’चा (समूहाने केलेली हत्या) गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करावी’, अशी मागणी केली. पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली होती. पोलिसांना कारवाई करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी २ दिवसांची समयमर्यादा दिली होती. ‘आरोपींना अटक न झाल्यास तीव्र आंदोलन करू’, अशी चेतावणी बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांनी दिली होती. सध्या कुरार पोलीस ठाण्याबाहेर मोठा बंदोबस्त तैनात आहे.
संपादकीय भूमिका
|