दिशा सालियन मृत्यू प्रकरण

मुंबई – दिशा सालियन मृत्यू प्रकरणात ३१ मार्च या दिवशी येथील २ माजी साहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिशाचे वडील सतीश सालियन यांचे अधिवक्ता नीलेश ओझा यांची भेट घेतली. त्यांना या प्रकरणाशी संबंधित अत्यंत संवेदनशील माहिती आणि पुरावे असणारा पेनड्राईव्ह दिला. ए.पी. निपुंगे आणि भीमराज घाडगे अशी २ माजी साहाय्यक पोलीस आयुक्तांची नावे आहेत. या पुराव्यांत छायाचित्रे, व्हिडिओ रेकॉर्डिंग, स्टिंग ऑपरेशन फुटेज आणि इतर अनेक महत्त्वाच्या दस्तऐवजांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.