कर्नाटक : मुसलमानांनी पंचगणाधीश्वर कोलशांतेश्वर मठाच्या स्वामीजींना कुराण भेट देऊन दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !

प्रतिकात्मक छायाचित्र

हरपनहळ्ळी (कर्नाटक) – कर्नाटकच्या विजयनगर जिल्ह्यातील हरपनहळ्ळी येथील पंचगणाधीश्वर कोलशांतेश्वर मठाच्या स्वामीजींना मुसलमान नेत्यांनी कुराण ग्रंथ भेट देऊन गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. मंगळुरूचे मौलाना मकसून उमरी म्हणाले, ‘कुराण ग्रंथ हा माणसाने आयुष्य कसे जगावे ?, याचे मार्गदर्शन करतो. कोणीही मोठा किंवा लहान नाही. आपण सर्व जण एक आहोत, ही भावना निर्माण करतो’,  असे त्यांनी सांगितले.

या वेळी स्वामीजी म्हणाले, ‘‘देव एकच असतो, केवळ त्याची नावे वेगवेगळी असतात. मुसलमान समाजातही विविध उपपंथे आहेत; पण सर्व जण कुराण वाचतात. रमजान महिन्याच्या शिस्तीला आणि उपवासाला विशेष महत्त्व आहे.’’