
पुणे – हिंदु नववर्षाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंदु संस्कृतीचे जतन आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने सामूहिक गुढी उभारण्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ग्रामदैवत कसबा गणपति येथे ‘गुढी कशी उभारावी ?’ याचे प्रात्यक्षिकाद्वारे प्रबोधन करण्यात आले आणि रामराज्य स्थापनेची प्रतिज्ञा झाली.

मंदिर महासंघाच्या वतीने करण्यात आलेले सामूहिक गुढीपूजन !
श्री बनेश्वर महादेव देवस्थान ट्रस्ट, नसरापूर, तालुका भोर, सासवड; श्री क्षेत्र कानिफनाथ गड मंदिर, बोपगाव; वडगाव काशिंबे, श्रीराममंदिर; नृसिंह भगवान मंदिर रांजणी, चांडोली खुर्द, चांडोली बुद्रुक, खडकी पिंपळगाव, शेवाळवाडी मंचर; श्री तुकाईमाता मंदिर, काळेपडळ, हडपसर, सिंहगड रस्ता, वल्लभनगर, सोरतापवाडी, आकुर्डी, मंचर; श्री दत्तगड देवस्थान, भोंगवली, तालुका भोर चंदननगर, सिंहगड रस्ता आदी ५० हून अधिक ठिकाणी सामूहिक गुढीपूजन करण्यात आले.



वैशिष्ट्यपूर्ण
१. महालक्ष्मी मंदिर, वडगांव, सिंहगड रस्ता येथे मंदिर महासंघाचे श्री. देवेंद्र शूरगुरुजी यांनी पुढाकार घेऊन सामूहिक गुढीचे नियोजन केले होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खडकवासला मतदारसंघाचे उपविभाग प्रमुख श्री. केतन शिंदे यांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले.
२. श्री हनुमान मंदिर, सोरतापवाडी, सोलापूर रोड, हडपसर येथे मंदिर महासंघाच्या वतीने आयोजित सामूहिक गुढीपूजनासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे संयोजक श्री चोरघे महाराज आणि धर्मप्रेमी श्री. बसवराज बिरादार यांनी पुढाकार घेऊन सामूहिक गुढीपूजनाचे नियोजन केले, तसेच हनुमान मंदिराचे गुरव यांनी गुढीपूजनासाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करून दिले.