(म्हणे) ‘काश्मीरमधील हिंदूंवरील अत्याचारांना मी उत्तरदायी असेन, तर मला फाशी द्या !’ – फारुख अब्दुल्ला

असे सांगून फारुख अब्दुल्ला स्वतःविषयी सहानुभूती मिळवू पहात आहेत. हिंदूंवरील अत्याचारांना कोण उत्तरदायी आहे, हे आता जनतेला समजले आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने या अत्याचारांविषयी चौकशी करून त्याला कोण कोण उत्तरदायी होते, हे अधिकृतरित्या देशासमोर आणि जगासमोर आणले पाहिजे आणि त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे ! – संपादक

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला

नवी देहली – जेव्हा काश्मीरमधील हिंदूंवरील आक्रमणांच्या चौकशीसाठी एक प्रामाणिक न्यायाधीश किंवा समिती स्थापन केली जाईल, तेव्हा सत्य बाहेर येईल. या घटनेला कोण उत्तरदायी आहे ? हे तुम्हाला कळेल. जर फारुख अब्दुल्ला उत्तरदायी असेल, तर फारुख अब्दुल्ला देशात कुठेही फाशी घ्यायला सिद्ध आहे; पण जे लोक उत्तरदायी नाहीत, त्यांना कोणत्याही पुराव्यांखेरीज दोष देऊ नका, असे विधान काश्मीरमधील ‘नॅशनल कॉन्सरन्स पक्षा’चे नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी ‘इंडिया टुडे’ नियतकालिकाला दिलेल्या विशेष मुलाखतीत केले. वर्ष १९८९ मध्ये काश्मिरी हिंदूंवर आक्रमणे झाली, तेव्हा फारुख अब्दुल्ला मुख्यमंत्री होती.

फारुख अब्दुला पुढे म्हणाले की,

१. मला वाटत नाही की, या हिंसाचाराला मी उत्तरदायी आहे. जर लोकांना त्या वेळी घडलेले कटू सत्य जाणून घ्यायचे असेल, तर त्यांनी त्या वेळचे गुप्तचर विभागाचे प्रमुख किंवा केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांच्याशी बोलले पाहिजे, जे त्या वेळी केंद्रीय मंत्री होते.

२. १९९० च्या दशकात केवळ काश्मिरी हिंदूंचेच नव्हे, तर काश्मीरमधील शीख आणि मुसलमान यांचे काय झाले ? याचीही चौकशी करण्यासाठी आयोग स्थापन केला पाहिजे. त्या वेळी माझे आमदार, मंत्री आणि कार्यकर्तेे त्या लोकांच्या शरिराचे तुकडे उचलत होते, इतकी गंभीर परिस्थिती होती.