‘नन’वर बलात्कार केल्याचा आरोप असणार्‍या माजी बिशप फ्रँको मुलक्कल याला ‘पाद्री’ म्हणून पुन्हा काम करण्यास पोप यांची अनुमती

केरळमधील सत्र न्यायालयाने निर्दोष ठरवल्याने अनुमती

तमिळनाडूतील देवसहायम् पिल्लई यांना व्हॅटिकनकडून ‘संत’ घोषित

पिल्लई हे पहिले भारतीय सामान्य व्यक्ती आहेत, ज्यांना संत घोषित करण्यात आले आहे. या वेळी भारतियांच्या समुदायाने तिरंगा ध्वज फडकावत आनंदोत्सव साजरा केला.

कॅनडामध्ये कॅथॉलिक चर्चकडून चालवण्यात येणार्‍या विद्यालयातील विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषणाचे प्रकरण

नुसती क्षमायाचना करून उपयोग नाही, तर याला उत्तरदायी असणार्‍यांना जगासमोर उघड केले पाहिजे. यांतील जे जिवंत आहेत, त्यांना शिक्षा केली पाहिजे आणि अशा घटना भविष्यात होणार नाहीत, यासाठी ‘व्हॅटिकन चर्च काय करणार आहे ?’, हेही घोषित केले पाहिजे !

झेलेंस्की यांच्याकडून पोप फ्रान्सिस यांना युद्धासंदर्भात मध्यस्थी करण्याचे आवाहन !

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी जगभरातील ख्रिस्त्यांचे धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांच्याशी रशिया-युक्रेन युद्धाविषयी चर्चा केली. ‘रशियासमवेत चालू असलेल्या युद्धाला पूर्णविराम मिळावा’, यासाठी पोप यांनी मध्यस्थी करावी, असे आवाहनही झेलेंस्की यांनी या वेळी केले.

देवासाठी तरी हे हत्याकांड थांबवा ! – पोप फ्रान्सिस

रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर पोप यांची भावनिक साद !

युक्रेनवर युद्ध लादण्यात आले आहे ! – पोप

युक्रेनवर युद्ध लादण्यात आले आहे. तेथे रक्त आणि अश्रू यांच्या नद्या वहात आहेत. हे युद्धच असून त्यात मृत्यू आणि विध्वंस होत आहे, असे प्रतिपादन ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी येथे केले.

लैैंंगिक शोषण करणार्‍या पाद्य्रांविरुद्ध कारवाई करण्यास कटीबद्ध !

पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात किती वासनांध पाद्य्रांवर कारवाई केली, हे त्यांनी घोषित केले पाहिजे अन्यथा ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’, असेच जगाला वाटेल !

माजी पोप बेनेडिक्ट यांनी पाद्य्रांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणी कठोर कारवाई केली नाही ! – जर्मनातील विधी आस्थापनाचा आरोप

विशेष नियमामुळे पाद्य्रांविरुद्ध गुन्हा नोंदवला जात नसल्याने त्यांचे फावते आहे. हा विशेष नियम हटवण्यासाठी आता व्हॅटिकनवर लोकांनी दबाव निर्माण करून पाद्य्रांना कारागृहात डांबण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

महिलांवर अत्याचार करणे हा भगवंताचा अवमान ! – पोप फ्रान्सिस

आमीष दाखवून गरीब आणि आदिवासी यांचे धर्मांतर करणे, त्यांची नंतर फसवणूक करणे, कॉन्व्हेंट शाळेमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना त्यांच्या धर्मानुसार आचरण करण्यास रोखणे, हाही भगवंताचाच अवमान आहे, असे पोप फ्रान्सिस कधी बोलणार अन् ख्रिस्ती मिशनर्‍यांना असे करण्यापासून कधी रोखणार ?

पोप फ्रान्सिस यांनी हिंदूंची क्षमा मागावी ! – विहिंप

विहिंपवर ही मागणी करण्याची वेळ येऊ नये. केंद्र सरकारने स्वतःचे हे सूत्र लावून धरले पाहिजे !