प्रतिकूल परिस्थितीतही श्रीकृष्णावर दृढ श्रद्धा ठेवून भक्तीमय जीवन जगणार्या खामगाव (जिल्हा बुलढाणा) येथील श्रीमती उषा सुधाकर मालव (वय ८१ वर्षे) !
लहानपणापासूनच कृष्णभक्ती हा उषाताईंच्या जीवनाचा एक भाग होता. उषाताई ४ वर्षांच्या असल्यापासून त्या मंदिरात जायच्या. ‘कृष्णाशी बोलणे, कृष्णाला दुःख सांगणे, फुले गोळा करून त्यांचा हार करून कृष्णाला घालणे आणि आनंदात घरी जाणे’, हा त्यांचा नित्य नेम होता.