झेलेंस्की यांच्याकडून पोप फ्रान्सिस यांना युद्धासंदर्भात मध्यस्थी करण्याचे आवाहन !

डावीकडून ख्रिस्त्यांचे धर्मगुरु पोप फ्रान्सिस डावीकडून आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की

कीव (युक्रेन) – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी जगभरातील ख्रिस्त्यांचे धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांच्याशी रशिया-युक्रेन युद्धाविषयी चर्चा केली. ‘रशियासमवेत चालू असलेल्या युद्धाला पूर्णविराम मिळावा’, यासाठी पोप यांनी मध्यस्थी करावी, असे आवाहनही झेलेंस्की यांनी या वेळी केले. झेलेंस्की यांनी ट्वीट करून सांगितले की, त्यांनी युक्रेनमधील अत्यंत बिकट मानवीय परिस्थितीच्या संदर्भात पोप यांना अवगत केले. जेरुसलेम हे युक्रेन आणि रशिया यांच्यातील शांती चर्चांसाठी अत्यंत चांगले ठिकाण असू शकते, असे याआधीही झेलेंस्की म्हणाले होते.