राज्यात अवयवदानात पुणे अव्वल !

अवयवदानात पुणे शहर अव्वल ठरले. वर्ष २०२१ मध्ये ११३ नातेवाइकांनी आपल्या रुग्णांच्या मृत्यूनंतर अवयवदानाची सिद्धता दर्शवली.

मुंबई येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित प्रांतीय हिंदु अधिवेशनाला प्रारंभ !

संतांच्या वंदनीय उपस्थितीत आणि धर्मप्रेमींच्या उत्साहपूर्ण सहभागाने ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’, ‘हर हर महादेव’ आदी स्फूर्तीदायक जयघोषात मुंबई येथे प्रांतीय हिंदु अधिवेशनाला १२ मार्च या दिवशी प्रारंभ झाला.

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची केंद्रीय अन्वेषण शाखेकडून चौकशी !

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वसुलीच्या प्रकरणात ११ मार्च या दिवशी केंद्रीय अन्वेषण शाखेने (सी.बी.आय्.) मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची ६ घंटे चौकशी केली.

श्री जोतिबा देवस्थान येथील मंदिराची चारही द्वारे खुली करण्याच्या आंदोलनास समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा पाठिंबा !

लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील श्री जोतिबा देवस्थान येथील मंदिरातील चारही द्वारे उघडून ‘ई-पास’ सुविधा बंद करावी, या मागणीसाठी जोतिबा डोंगर येथे ११ मार्चपासून धरणे आंदोलन चालू करण्यात आले आहे.

मरणासन्न काँग्रेस !

काँग्रेस आता शेवटची घटका मोजत आहे. ‘काँग्रेसला आता राजकीयदृष्ट्या संपवायचे’, असा निश्चय हिंदूंनी केला आहे. या निर्णयात ते पालट करणार नसल्यामुळे हा पक्ष लवकरच इतिहासजमा होईल, हे निश्चित !

आक्रमकांच्या स्मृती पुसाच !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील ‘औरंगाबाद’ शहराचे नाव ‘संभाजीनगर’ करण्याची मागणी केली; परंतु आजपर्यंतच्या कुठल्याही शासनकर्त्यांना ती पूर्ण करता आली नाही. आज त्याच शिवसेनाप्रमुखांचा पक्ष महाराष्ट्रात सत्तेत आहे. त्यामुळे या सरकारच्या कारकीर्दीत तरी शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण होईल, अशी आशा आहे.

संपूर्ण देशात समान नागरी कायदा हवा !

उत्तराखंडमध्ये भाजपचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर समान नागरी कायदा राज्यात लागू करू, असे प्रतिपादन उत्तराखंडमधील भाजपचे मावळते मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केले.

युक्रेनचा गनिमी कावा आणि त्याने केलेल्या चुका !

रशियाचे रणगाडे १००-२०० किलोमीटर परिसरात पसरले आहेत. शत्रूची वाहने शहराच्या आत आलेली आहेत. त्यांच्यावर युक्रेनचे सैनिक रॉकेट लाँचरच्या साहाय्याने आक्रमणे करून त्यांचा घात करत आहेत आणि याविषयीच्या अनेक चित्रफिती प्रसारित झाल्या आहेत.

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : १३.३.२०२२

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत.

एका शहरातील विशेष शाखेच्या पोलिसांकडून सनातनच्या साधकांची चौकशी

सनातनच्या साधकांच्या मागे पोलिसांचा नाहक ससेमिरा चालूच ! सनातनच्या राष्ट्र आणि धर्म प्रेमी साधकांऐवजी अशी चौकशी जिहादी आतंकवाद्यांची केली असती, तर देश एव्हाना आतंकवादमुक्त झाला असता ?