परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग मिळाल्यापासून फोंडा (गोवा) येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालिका कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय १० वर्षे) हिच्यात जाणवलेले पालट
श्रियामधील पालट प.पू. गुरुदेव तिच्यावर करत असलेल्या साधनेच्या संस्कारांमुळेच आहेत. पालक म्हणून श्रियाला घडवण्यासाठी आम्हाला वेगळे काहीच प्रयत्न करावे लागले नाहीत. ‘श्रियामधील सर्व गुण तिला प.पू. गुरुदेवांकडूनच मिळाले आहेत’, असे आम्हाला नेहमीच जाणवते.