सनातनच्या साधकांच्या मागे पोलिसांचा नाहक ससेमिरा चालूच ! सनातनच्या राष्ट्र आणि धर्म प्रेमी साधकांऐवजी अशी चौकशी जिहादी आतंकवाद्यांची केली असती, तर देश एव्हाना आतंकवादमुक्त झाला असता ?
… या दिवशी एका शहरातील पोलीस ठाण्यातील विशेष शाखेच्या पोलिसांनी सनातनच्या दोन साधकांकडे ‘सनातन प्रभात’, ‘सनातन संस्था’ यांच्या कार्याविषयी आणि सनातनच्या काही साधकांविषयी चौकशी केली. या वेळी त्यांच्यात पुढीलप्रमाणे संभाषण झाले.
पोलीस : … भागातील कार्य कोण पहातात ?
पहिले साधक : मी गेल्या २ वर्षांपासून माझ्या वैयक्तिक अडचणींमुळे कार्यात सहभागी नाही. दुसरे साधक पहातात.
(त्यानंतर पोलिसांनी दुसर्या साधकाला संपर्क करून त्याची चौकशी केली.)
पोलीस : मी … येथील पोलीस ठाण्यातील विशेष शाखेतून बोलत आहे. ‘सनातन प्रभात’चे सध्या काय कार्य चालू आहे ? कोण कोण कार्य पहातात ?
दुसरे साधक : याविषयी मला नेमकेपणाने सांगता येणार नाही. गेली दोन-अडीच वर्षे कोरोनामुळे सर्व बंद आहे. सध्या फक्त साधना चालू आहे.
५-६ दिवसांनी याच शहरातील अन्य एका पोलीस ठाण्यातील पोलिसांनी वरील दोन्ही साधकांना दूरभाषवर संपर्क साधून चौकशी केली. त्या वेळी झालेले संभाषण येथे दिले आहे.
पोलीस : मी तुमच्या घराजवळ थांबलो आहे. मला भेटायला येता ना ?
पहिले साधक : मी गेली २ वर्षांपासून दुसर्या गावात आहे. काय काम होते ?
पोलीस : ‘सनातन प्रभात’विषयी माहिती हवी होती.
पहिले साधक : सध्या मी संपर्कात नाही. त्यामुळे मला याविषयी काही माहीत नाही.
(त्यानंतर पोलिसांनी दुसर्या साधकाला संपर्क केला.)
पोलीस : या भागात ‘सनातन प्रभात’चे काय कार्य चालू आहे ? याची माहिती हवी आहे.
दुसरे साधक : गेली दोन-अडीच वर्षे दळणवळण बंदीमुळे बाहेर माझे जाऊन संपर्क करणे बंद आहे. त्यामुळे सध्या नामजप, साधना चालू आहे. तुम्हाला काय माहिती हवी होती ?
पोलीस : सनातन संस्थेचे कार्य चांगले आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे.
(या वेळी पोलिसांनी अन्य काही साधकांविषयीही माहिती विचारली. या वेळी दुसर्या साधकाने या साधकांशी सध्या संपर्क नसल्याने त्यांच्याविषयी आपल्याला काही माहीत नसल्याचे सांगितले.)