धर्मादाय ट्रस्टलाही आता १८ टक्के वस्तू आणि सेवा कर भरावा लागणार !

जर देणगीचा उद्देश धर्मादाय असेल, कोणताही व्यावसायिक लाभ करून देणारा नसेल आणि विज्ञापन करत नसेल, तर त्यावर जी.एस्.टी. लागू होणार नाही. इतर सर्व देणग्यांवर १८ टक्के जी.एस्.टी. लागू होईल.

न्यायाधिशांना मारहाण करणारे पोलीस जनतेशी कसे वागत असतील, हे लक्षात येते !

अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांच्यावर आक्रमण केल्याच्या आणि त्यांना अश्‍लील शब्दांत शिवीगाळ केल्याच्या प्रकरणी दोघा पोलिसांना अटक करण्यात आली. या पोलिसांनी न्यायाधीशांना मारहाण करत त्यांच्यावर पिस्तुल रोखले !

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे खरे स्वरूप !

‘शास्त्रज्ञ विषयाचा अभ्यास करून दुसर्‍याच्या म्हणण्यातील चुका सांगतात, तर बुद्धीप्रामाण्यवादी अभ्यास न करता नुसताच वादविवाद करतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

नक्षलवाद्यांच्या हत्येचा सूड उगवू !

नक्षलवादी संघटनांची पत्रकाद्वारे धमकी ! अशा धमक्या येऊ नयेत, यासाठी नक्षलवादच समूळ नष्ट करायला हवा !

बांगलादेशच्या दौर्‍यावर असणारा पाकिस्तानी क्रिकेट संघ सरावाच्या वेळी पाकचा झेंडा लावत असल्याने होत आहे विरोध !

बांगलादेशमधील अनेक क्रिकेटप्रेमींनी ‘पाकिस्तानी संघाने जाणीवपूर्वक खोडसाळपणा करत बांगलादेश स्वतंत्र्य होण्याच्या सुवर्ण जयंतीच्या कार्यक्रमाआधी राजकीय हेतूने हे कृत्य केले आहे’, असा आरोप केला आहे.

कंगना राणावत काहीच चुकीचे बोलली नाही, हे माझे मत मी पालटणार नाही ! – विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेते

माझे भाषण माध्यमांनी पूर्ण दाखवले नाही. माध्यमांनी माझ्या भाषणाचा विपर्यास केला; पण मी माझ्या मतांवर ठाम आहे. १८ मे २०१४ या दिवशी खर्‍या अर्थाने देशाने जागतिक पटलावर उभे रहायला प्रारंभ केला.

मोर्चे काढून दहशत निर्माण करणार्‍या रझा अकादमीवर बंदी आणण्याची मागणी

त्रिपुरामधील कथित घटनांच्या निषेधार्थ महाराष्ट्रात रझा अकादमीच्या धर्मांधांनी हिंदु व्यापार्‍यांवर आक्रमण केले. दुकानांची तोडफोड, पोलिसांना मारहाण, वाहनांची जाळपोळ आणि खासगी मालमत्तेची हानी करण्यात आली होती.

त्रिपुरा येथील कथित घटनेवरून महाराष्ट्रात दंगल घडवणार्‍या जिहाद्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी !

त्रिपुरा येथील कथित घटनेवरून महाराष्ट्रात दंगल घडवणार्‍या जिहाद्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सातारा येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.

(म्हणे) ‘महाराष्ट्र, बंगाल आणि केरळ सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न !’ – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

‘शेती हा देहलीचा नव्हे, तर राज्याचा विषय आहे. आम्ही कृषी विद्यापिठांना विचारून निर्णय घेत होतो’, अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

एस्.टी.च्या भरतीतील प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांना सेवेत घेण्याची शक्यता !

राज्य परिवहन महामंडळाने कर्मचार्‍यांचा संप मोडीत काढण्यासाठी रोजंदारीवर काम करणार्‍याना सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे. उर्वरित कर्मचारी कामावर न आल्यास नवीन कामगारांना कामावर घेण्याचे संकेत परिवहनमंत्र्यांनी दिले आहेत.