५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला राजगुरुनगर, पुणे येथील कु. अथर्व संतोष औटी (वय १३ वर्षे) !

राजगुरुनगर, पुणे येथील कु. अथर्व संतोष औटी याचा कार्तिक कृष्ण पक्ष प्रतिपदा (२०.११.२०२१) या दिवशी १३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

५४ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मुंबई येथील चि. ऋत्वी विकास सणस (वय २ वर्षे) !

कार्तिक कृष्ण पक्ष द्वितीया (२१.११.२०२१) या दिवशी वडाळा (मुंबई) येथील चि. ऋत्वी विकास सणस हिचा तिथीनुसार २ रा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची तिच्या आईला आणि नातेवाइकांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.

रामनाथीच्या गुरुदेवा, शरण मी आले तुला ।

‘२०.८.२०२० या दिवशी मी नामजप करतांना माझे मन पुष्कळ अस्वस्थ होते. मला काहीच सुचत नव्हते. ‘गुरुदेवा, कशी शरण येऊ तुजला’, अशा विचाराने मला पुढील ओळी सुचल्या.

‘स्वप्नातही श्री गुरूंचे लक्ष आपल्याकडे आहे’, याविषयी साधिकेला आलेली अनुभूती आणि श्री गुरूंनी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या माध्यमातून दिलेली शिकवण !

‘‘सद्गुरु काका तुझ्या स्वप्नात आले आणि सर्वकाही ठीक झाले. याचा अर्थ प.पू. गुरुदेवच आले, म्हणजेच ते सदैव तुझ्या समवेत असतात आणि ते प्रत्येक अडचणीतून तुला मुक्त करतील.’’

नामजपाच्या वेळी मानसपूजा करतांना भगवंताच्या द्विभुजधारी तेजस्वी रूपाचे दर्शन होणे

४.८.२०२० या दिवशी संध्याकाळी मी भगवान श्रीकृष्णाचा नामजप करतांना मानसपूजा करत होते. मानसपूजा संपल्यानंतर मी सूक्ष्मातून देवाच्या चरणांजवळ बसले. तेव्हा मला भगवंताचे द्विभुजधारी रूप दिसले. त्या तेजाला मी डोळ्यांनी पाहू शकत नव्हते, इतके ते तेजस्वी रूप होते.