मुंबई, १० मार्च (वार्ता.) – यापूर्वी धोबी तलाव येथील रंगभवन येथे मराठी भवन उभारण्यात येणार होते; मात्र ही जागा पुरातत्व विभागाच्या मालकीची आहे. या ठिकाणी रुग्णालय असल्यामुळे ही जागा शातंताक्षेत्रात येते. त्यामुळे आता मरीन ड्राईव्ह येथील जवाहरलाल बालभवन येथे मराठी भवन उभारण्यात येणार आहे. ही जागा कह्यात घेण्याची प्रक्रिया चालू असून त्यासाठीचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे करण्यात आला आहे. जागा कह्यात आल्यावर कामाला प्रारंभ करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ८ मार्च या दिवशी विधान परिषदेत दिली. सभागृहातील अर्थसंकल्पाच्या चर्चेवर त्यांनी वरील माहिती दिली.