चिखली (जिल्हा बुलढाणा) येथील अनुराधा नागरी सहकारी बँकेत अपहार करणार्‍यांवर फौजदारी गुन्हा नोंद करण्याची मागणी

विरोधकांचा गदारोळ

मुंबई, १० मार्च (वार्ता.) – बुलढाणा जिल्ह्यातील चिखली गावातील अनुराधा नागरी सहकारी बँकेमध्ये वर्ष २००६-०८ या कालावधीत राज्य आणि केंद्र शासनांकडून कर्ज वाटपासाठी एकूण ३ कोटी २४ लाख रुपयांचा निधी वितरीत केला होता; मात्र या बँकेने खोटी कर्ज खाती दाखवून २ कोटी ३७ लाख रुपयांचा अपहार केला आहे. चौकशी समितीनेही तसाच खोटा अहवाल सिद्ध केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर फौजदारी कारवाई करून २ कोटी ३७ लाख रुपयांची रक्कम वसूल करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १० मार्च या दिवशी विधानसभेत केली.

श्वेता महाले, भाजप

या वेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर न दिल्याने विरोधकांनी सभागृहात गदारोळ घातला. भाजपच्या आमदार श्रीमती श्वेता महाले यांनी प्रश्नोत्तराच्या घंट्यांत हा प्रश्न विचारला होता.