चुकीचे वर्णन करून मतपेटीचे राजकारण करणे ब्रिटीश खासदारांनी टाळावे ! – भारताने ब्रिटनच्या उच्चायुक्तांना सुनावले

ब्रिटनच्या संसदेत भारतातील कृषी कायद्यावरून चर्चा

  • भारताच्या संसदेत ब्रिटनमधील घटनांविषयी, विशेषतः वर्णद्वेषाविषयी चर्चा करण्यात यावी का ? असे ब्रिटनला भारताने विचारले पाहिजे !
  • ब्रिटिशांना भारतातून हाकलले; मात्र भारतावर अधिकार गाजवण्याची खुमखुमी त्यांच्यात अजूनही दिसून येते. ब्रिटनला समजेल, अशा भाषेत भारताने प्रत्युत्तर दिले पाहिजे !

नवी देहली – भारताच्या कृषी धोरणांवर ब्रिटीश संसदेत चर्चा होणे हा लोकशाही असलेल्या अन्य देशातील राजकीय क्षेत्रातील हस्तक्षेप आहे. चुकीचे वर्णन करून मतपेटीचे राजकारण करणे ब्रिटीश खासदारांनी टाळावे, असा सल्ला परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी ब्रिटनच्या उच्चायुक्तांना दिला आहे.

परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला

ब्रिटीश संसदेत भारतातील कृषी सुधारणांविषयी चर्चा करण्यास आली. त्याविषयी भारताने ब्रिटीश उच्चायुक्तांना पाचारण करून त्यांच्याकडे याविषयी तीव्र आक्षेप नोंदवला. ‘संतुलित चर्चा होण्याऐवजी वस्तूस्थिती जाणून न घेताच अयोग्य पद्धतीने चर्चा करण्यात आली’, असे सांगत भारताने अप्रसन्नता व्यक्त केली. एकतर्फी चर्चा केल्याचा लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाने निषेध केला आहे. ब्रिटनमधील खासदारांच्या एका गटाने ही चर्चा घडवून आणली होती.