महागाव जिल्हा सातारा येथील मातोश्री वृद्धाश्रमात १९ जण कोरोनाबाधित

सातारा, १० मार्च (वार्ता.) – येथील महागावस्थित मातोश्री वृद्धाश्रमात १९ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले. संबंधितांवर तात्काळ उपचार चालू करण्यात आले असून एका वृद्धाला सातारा येथील जम्बो कोविड रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तसेच महागाव ग्रामपंचायतीला आश्रम सँनिटाईझ करायला सांगितले आहे, अशी माहिती चिंचणेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्रीकांत कारखानीस यांनी दिली. … Read more

 नीरा नदीकाठावर गोवा राज्यातून आलेला मद्याचा ट्रक पकडला

गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या मद्याची अवैधरित्या वाहतूक करणार्‍या ट्रकवर नीरा नदीच्या काठी राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने कारवाई केली.

कोरोनाबाधित रुग्णांची अपुरी माहिती पाठवणार्‍या खासगी प्रयोगशाळांना टाळे !

अशा कामचुकार आणि हलगर्जीपणा करणार्‍या प्रयोगशाळांवर कठोर कारवाई करायला हवी ! पुणे – कोरोनाबाधित असणार्‍या रुग्णांची अपुरी माहिती पाठवणार्‍या ३ खासगी प्रयोगशाळांना पुणे महापालिकेने टाळे ठोकले आहेत. यामध्ये क्रस्ना लॅब, मेट्रोपोलीस लॅब आणि सब अर्बन डायग्नोस्टिक सेंटर या प्रयोगशाळांचा समावेश आहे. पुढील आदेश येईपर्यंत कोरोनाची चाचणी करू नका, अशी सूचना या प्रयोगशाळांना दिली आहे. कोरोनाबाधित … Read more

पुणे येथील सेवा विकास को-ऑपरेटीव्ह बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक 

पिंपरी-चिंचवडमधील सेवा विकास को-ऑपरेटीव्ह बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांना अधिकोषातील २३८ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ७ मार्चला रात्री अटक केली.

भारत पाकिस्तानला देणार साडेचार कोटी कोरोना लसीचे डोस

‘द ग्लोबल अलायंस फॉर वैक्सीन अँड इम्यूनायजेशन (जीएव्हीआय) या संघटेच्या अंतर्गत भारत पाकिस्तानला कोरोना लसीचे ४ कोटी ५० लाख डोस देणार आहे.

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेसाठी विधीमंडळाच्या पायर्‍यांवर विरोधकांचे आंदोलन

मुंबई, १० मार्च (वार्ता.) – मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी संशयित असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात यावी, यासाठी १० मार्च या दिवशी विधीमंडळाच्या इमारतीच्या पायर्‍यांवर विरोधकांनी आंदोलन केले. भाजप आणि मित्र पक्षांच्या आमदारांनी फलक दाखवून शासनाचा निषेध केला. घोषणा देऊन सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली.

भाजप कामगार आघाडीच्या वतीने विविध प्रश्‍नांसाठी साहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन !

सांगली जिल्हा भारतीय जनता पक्ष कामगार आघाडीच्या वतीने साहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांना सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध प्रश्‍नांविषयी निवेदन देण्यात आले.

मजबूत राष्ट्रनिर्मितीसाठी स्त्रीशक्तीचे योगदान महत्त्वाचे ! – सौ. स्वाती यादव, शिवसेना

जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने करवीर महिला शिवसेना आघाडीच्या वतीने आशासेविकांच्या सत्कार सोहळ्यात सौ. स्वाती यादव बोलत होत्या.

आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आंदोलन करणार्‍या श्रमजीवी संघटनेच्या ७० कार्यकर्त्यांना अटक

आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाच्या बाहेर ९ मार्च या दिवशी सकाळी आंदोलन करणार्‍या श्रमजीवी संघटनेच्या ७० कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

पुण्याला अर्थसंकल्पातून काय मिळणार याविषयी अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या महत्त्वाच्या घोषणा !

पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ आणि आणखी एक विमानतळ उभारण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.