पाकिस्तानमध्ये गेल्यावर्षी अपहरण करण्यात आलेल्या ख्रिस्ती मुलीचा धर्मांतर करून विवाह

पाकमधील असुरक्षित अल्पसंख्य ! कोणतीही मानवाधिकार संघटना याविषयी काहीही करत नाही, हेच वास्तव आहे !

(प्रतिकात्मक चित्र)

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या फैसलाबाद येथे गेल्यावर्षी २५ जून या दिवशी एका अल्पवयीन ख्रिस्ती मुलीचे अपहरण करण्यात आले होते. तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ती सापडली नव्हती. अपहरणकर्त्यांनी तिच्या पालकांना, ‘जर शोधण्याचा प्रयत्न केला, तर पश्‍चात्ताप करावा लागेल’, अशी धमकीही दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी जवळपास ३ मास तक्रारही प्रविष्ट करून घेतली नव्हती. त्यांना पोलीस ठाण्यातून हाकलून लावण्यात आले होते. अनेक मासांनी या मुलीचे धर्मांतर करून बलपूर्वक विवाह करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे.

अपहरण केल्यानंतर तिला घरापासून ११० किमी दूर असणार्‍या ठिकाणी नेण्यात आले. तेथे तिच्यावर बलात्कार करण्यात अला. तिला दोरखंडाने बांधून ठेवण्यात आले होते. तिच्याकडून घरची कामे करवून घेण्यात येत होती. नंतर तिचे धर्मांतर करून विवाह लावून देण्यात आला.