वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर पुणे येथील कोविड केअर सेंटर पुन्हा चालू करण्याचा निर्णय !

पुणे, १० मार्च – येथील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुणे महापालिकेने शिवाजीनगरचे दळवी रुग्णालय आणि रक्षकनगर स्टेडियम येथील कोरोना काळजी केंद्र (कोविड केअर सेंटर) चालू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महापालिकेचे साहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली.

दळवी रुग्णालयात ७५ ऑक्सिजनयुक्त खाटा असणार आहेत, तर रक्षकनगर येथील केंद्रात २५० ते ३०० खाटा उपलब्ध असणार आहेत.