महाविकास आघाडी मराठी भाषा विद्यापिठाची स्थापना करेल ! – उदय सामंत, उच्चशिक्षणमंत्री

मुंबई, १० मार्च (वार्ता.) – अन्य भाषांची विद्यापिठे आहेत, त्याप्रमाणे मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी मराठी भाषा विद्यापिठाची स्थापना करण्यात यावी, अशी विनंती वर्ष २०१३ मध्ये मराठी भाषा सल्लागार समितीने शासनाकडे केली होती. त्यावर लवकरच कार्यवाही करण्यात येईल. समितीच्या विनंतीनुसार शासनाने मराठी भाषा विद्यापिठाची स्थापना करण्याचा निश्‍चिय केला आहे, असे निवेदन उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी १० मार्च या दिवशी विधान परिषदेत केले.