रस्त्यावर कचरा टाकणारे आणि थुंकणारे यांच्यावर दंडात्मक कारवाई ! – कोल्हापूर महानगरपालिकेचा निर्णय
रस्त्यावर कचरा टाकणारे तसेच थुंकणारे यांच्यावर दंडात्मक कारवाईचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. रस्त्यावर कचरा टाकल्याचे आढळल्यास जागेवरच १५० रुपये, तर थुंकल्यास १०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.