कचरा वाहून नेणार्‍या गाड्यांवर लावले कुंभमहापर्वाचे चित्र !

प्रयागराज महानगरपालिकेचा संतापजनक प्रकार !

प्रयागराज, ७ जानेवारी (वार्ता.) – प्रयागराज महानगरपालिकेने कुंभक्षेत्री कचरा वाहून नेणार्‍या गाड्यांवर महाकुंभपर्वाचे चित्र लावल्याचा संतापजनक प्रकार दिसून येत आहे. हे वाहन पाहून अनेक भाविक तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. या चित्रात साधू, गंगानदी, कुंभकलश आदी हिंदूंच्या श्रद्धास्थानांची चित्रे असल्यामुळे ती अशा प्रकारे कचरा वाहक गाड्यांवर लावणे, हा हिंदूंच्या धार्मिक भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे, अशीही प्रतिक्रिया भाविक व्यक्त करत आहेत. हे चित्र लवकरात लवकर हटवण्याची मागणीही भाविकांनी प्रयागराज महानगरपालिकेकडे केली आहे.