राज्यात १ सहस्र ‘विमा सखी आयुर्विमा एजंट’ नियुक्त करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

एका महिलेला एजंट म्हणून नियुक्तीपत्रदेतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, ७ जानेवारी (वार्ता.) – गोव्यातील एक सहस्र महिलांना ‘विमा सखी आयुर्विमा एजंट’ म्हणून नियुक्त करून स्वावलंबी करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोनापावला येथे राजभवनाच्या ‘दरबार’ सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात ही घोषणा केली.

काय आहे ‘विमा सखी’ योजना?

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘विमा सखी’ ‘एल्.आय.सी.’ एजंट बनणार्‍या महिलांना प्रथम प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांची पुढे परीक्षा घेऊन त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांची ‘आयुर्विमा एजंट’ म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक महिलेची किमान १० वी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे, तसेच महिलेकडे संवादाची उत्तम शैली पाहिजे. यामुळे महिला समुपदेशन करून लोकांना आयुर्विमा पॉलिसी देऊ शकणार आहे. महिलांना या क्षेत्रात भरपूर वाव आहे’. ‘विमा सखी’ बनल्यानंतर तिला प्रतिमहिना ७ सहस्र रुपये ‘स्टायपेंड’, तसेच वर्षाला २४ ‘पॉलिसी’ केल्यावर तिला ४८ सहस्र ‘बोनस’ दिला जाणार आहे. केंद्र सरकारचा हा उपक्रम आहे.

हरियाणा राज्यात हा उपक्रम १७ डिसेंबर या दिवशी चालू झाला आहे आणि आता तो गोव्यात लागू केला जात आहे.