तुम्हाला रस्त्यांची दुर्दशा पाहून लाज वाटत नाही का ?

केरळमधील रस्त्यांच्या दुर्दशेवरून केरळ उच्च न्यायालयाने अधिकार्‍यांना फटकारले !
देखभाल करण्याचे ठाऊक नसेल, तर अभियंत्यांनी त्यागपत्र द्यावे ! – उच्च न्यायालय

डिसेंबरपर्यंत ४ तालुक्यांतील रस्ते खड्डेमुक्त करणार ! – बांधकाम विभागाचे मनसेला आश्वासन 

 प्रशासकीय अधिकारी कामांसाठी नागरिकांच्या आंदोलनाची वाट का पहातात ? आधीच नोंद घेऊन रस्ते दुरुस्त का करत नाहीत ?

दोडामार्गमधील रस्त्यांच्या कामाचा कार्यारंभ आदेश निघाल्याने भाजपचे आंदोलन स्थगित

आमदार नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना चेतावणी देताना सांगितले की, ‘उपोषण स्थगित केले म्हणजे सुटलो, असा समज करून घेऊ नका. आमच्याकडे लोकशाहीने दिलेले अन्य मार्गही आहेत’, याची जाणीव ठेवा.

बांदा-दोडामार्ग रस्त्याच्या कामासाठी आजपासून भाजपचे पुन्हा आंदोलन

बांदा-दोडामार्ग-आयी, तसेच दोडामार्ग ते वीजघर या मार्गांच्या दुरवस्थेविषयी प्रशासनाचे लक्ष वेधूनही आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या नाकर्तेपणाच्या विरोधात ८ नोव्हेंबरपासून जनआंदोलन आणि उपोषण करण्यात येईल, अशी चेतावणी दोडामार्ग भाजपच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

मालवण तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून पंचायत समिती सदस्य आक्रमक

रस्त्यांच्या दुरवस्थेवरून पंचायत समिती सदस्यांना आक्रमक व्हावे लागणे आणि त्यावरून बाचाबाची होणे प्रशासनाला लज्जास्पद !

वैजापूर (संभाजीनगर) येथे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे महिलेची वाहनातच प्रसुती

रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या दिवसेंदिवस भीषण होत असल्याचे उदाहरण ! आता तरी खड्डे न बुजवणार्‍या दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई केली जाणार का ?

मेट्रो कि चांगले रस्ते ?

सध्या जळगाव शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारत ‘आमच्या किडन्या विका; पण शहरातील रस्ते दुरुस्त करा’, अशी मागणी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडे केली.

डॉ. विजय जोशी यांना ऑस्ट्रेलियन सरकारचा ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा मानाचा पुरस्कार प्रदान !

विद्वान आणि हुशार भारतीय संशोधक, तज्ञ हे संशोधक वृत्तीने अन् कष्ट करून संशोधन करतात; मात्र भारतात त्याला योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे ते विदेशाची वाट धरतात. प्रज्ञावंतांचा हा उपहास टाळण्यासाठी शासनकर्त्यांनी प्रयत्न करायला हवेत !

जामखेड (जिल्हा नगर) तालुक्यातील डोळेवाडी येथे पक्का रस्ताच नाही !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही रस्त्यांची दयनीय अवस्था असणे चिंताजनक ! स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे होऊनही भारतातील खेडेगावांमध्ये ही अवस्था आहे.

जिल्ह्यातील रस्त्यांच्या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘शिवप्रेमी सिंधुदुर्ग’ संघटनेच्या वतीने पिंगुळी येथे ‘भीक मागा’ आंदोलन !

चांगले रस्ते मिळावेत, या प्राथमिक आवश्यकतेसाठीही जनतेला ‘भीक मागा’ आंदोलन करून पैसे गोळा करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !