बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मलकापूर आणि अतिग्रे (जिल्हा कोल्हापूर) येथे मूक आंदोलन !

मलकापूर येथील आंदोलनात सहभागी धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर, ७ जानेवारी (वार्ता.) – बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, तेथील मंदिरांचे रक्षण करावे, तसेच अन्य मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मलकापूर आणि अतिग्रे येथे मूक आंदोलन करण्यात आले. यात धर्मप्रेमींनी हस्तफलक धरून प्रबोधन आणि जागृती केली. मलकापूर येथे आंदोलनात भाजपाचे श्री. मधुकर लाड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. महेश विभूते, मंदिर महासंघाचे श्री. उदयसिंह कोकरे-देसाई आणि श्री. महेश कोठावळे, श्री. चारुदत्त पोतदार, श्री. रमेश पडवळ, श्री. जितेंद्र पंडित, डॉ. आंबेकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी यांसह नागरिक आणि महिला उपस्थित होत्या.

अतिग्रे येथील सांगली-कोल्हापूर राज्य महामार्गावर झालेल्या आंदोलनात सरपंच श्री. सुशांत वड्ड, भाजपचे शहर अध्यक्ष श्री. विश्वास पाटील, आनंदवन ग्रुपचे उपाध्यक्ष श्री. दादासो पाटील, श्री. कृष्णात पाटील, डॉ. एस्.आर्. पाटील यांसह ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलन पाहून गावातील काही वयोवृद्ध ग्रामस्थही फलक धरून त्यात सहभागी झाले होते.

अतिग्रे येथील आंदोलनात सहभागी ग्रामस्थ, धर्मप्रेमी