अहिल्यानगर येथील मंदिरांच्या सुरक्षेसाठी, तसेच बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी योग्य ती उपाययोजना करावी !

अहिल्यानगर येथील राष्ट्रीय हिंदु आंदोलनात हिंदुत्वनिष्ठांची मागणी !

आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ

अहिल्यानगर, ७ जानेवारी (वार्ता.) – येथील पुणतांबा येथे महादेवाच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. पुणतांबा येथे एकाच महिन्यातील ही दुसरी घटना असून १३ डिसेंबरला हनुमान मंदिरात, तर २३ डिसेंबरला महादेव मंदिरात मूर्तीची विटंबना करण्यात आली. या घटनेचे त्वरित अन्वेषण करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती उपाययोजना करावी, या मागण्यांसाठी अहिल्यानगर येथील दिल्लीगेट येथे सायंकाळी ५ ते ६ या वेळेत हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले.

आंदोलनाला हिंदुत्वनिष्ठ श्री. दिगंबर गेंट्याल, छावा युवा मराठा महासंघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकर गोरे, मंदिर महासंघाचे गणेश पलंगे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख आणि अहिल्यानगर जिल्हा हिंदु संघटक बापू ठाणगे, भाजप महिला आघाडीच्या सौ. सुरेखा विद्दे, सनातन संस्थेचे विनायक बत्तीन, हिंदु जनजागृती समितीचे परमेश्वर गायकवाड, संतोष गवळी, गणेश वाळुंजकर यांसह ३५ हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

भारत सरकारने बांगलादेशातील हिंदू आणि तेथील मंदिरे सुरक्षित करावीत, असे अधिवक्ता नामदेव जायभाय यांनी सांगितले. या वेळी दिगंबर गेंट्याल, बापू ठाणगे यांनीही मनोगत व्यक्त केले.

क्षणचित्रे 

१. ‘काश्मीरप्रमाणे महाराष्ट्रात हिंदूंची वाईट स्थिती होण्यास वेळ लागणार नाही’, असे म्हणून स्थानिक महिला आंदोलनात सहभागी झाली.

२. येणारे-जाणारे उभे राहून आंदोलनाचा विषय ऐकत होते.

३. दुचाकीवालेही आंदोलन पाहून ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होते.

आंदोलनातील मागण्या !

१. पुणतांबा येथील हनुमान मंदिर आणि महादेव मंदिरातील घटनांची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी.

२. आरोपी खरोखर मनोरुग्ण आहे का ? याची पडताळणी सक्षम वैद्यकीय अधिकार्‍यांच्या वतीने करावी.

३. जिल्ह्यातील सर्व मंदिरांतील दानपेट्या चोरीच्या घटनांची सखोल चौकशी करून दोषींना अटक करण्यात यावी.

४. जिल्ह्यातील सर्व मंदिरांना योग्य ती सुरक्षा पुरवण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना होणार नाहीत.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची विटंबना होऊन १ मास उलटला, तरीही आरोपींवर कारवाई न होणे हा हिंदुद्रोहच होय !