कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावरील त्रिपुरारी पौर्णिमेच्या उत्सवावर कोरोनाचे सावट, मंदिर प्रदक्षीणेवर निर्बंध घातल्यामुळे भाविकांमध्ये नाराजीचा सूर

कल्याण, १ डिसेंबर (वार्ता.) – येथील दुर्गाडी किल्ल्यावर त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो; मात्र यंदा कोरोनाचे संकट असल्यामुळे मंदिर प्रदक्षिणा, तसेच मंदिराच्या आवारात फिरण्यासाठी निर्बंध घालण्यात आले होते. मंदिराला प्रदक्षिणा घालण्याच्या ठिकाणी बाकडे लावून ठेवण्यात आले होते, तसेच मंदिर परिसरात अधिक वेळ थांबू दिले जात नव्हते. त्यामुळे शासनाने मंदिरे चालू केली असली, तरी तेथे मोकळेपणाने फिरता येत नसल्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाविषयी भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. कोरोनाचे नियम पाळून मंदिर प्रदक्षिणा लवकरात लवकर चालू करावी, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.