कोल्हापूर – येथे रस्त्यावर कचरा टाकणारे तसेच थुंकणारे यांच्यावर दंडात्मक कारवाईचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. रस्त्यावर कचरा टाकल्याचे आढळल्यास जागेवरच १५० रुपये, तर थुंकल्यास १०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. येणार्या नवीन वर्षात कंटेनर मुक्त शहराचा संकल्प महापालिकेने केला आहे. त्यामुळे प्रमुख चौकातील कचरा साठवून ठेवणारे कंटेनर हटवण्याचे काम चालू आहे. रस्त्यांवर चालत्या वाहनांवरून पिचकारी मारणार्यांची संख्या पुष्कळ आहे. उघड्यावर शौच अथवा लघुशंका करणार्यांना १०० रुपये, तर एखाद्या मोठ्या प्रमाणावर कचर्याची निर्मिती करून तो उघड्यावर टाकल्यास ५०० रुपये इतका दंड आकारला जाणार आहे.