सुरक्षाव्यवस्थेवर ताण येऊ न देण्यासाठी निर्णय
प्रयागराज – अमृत स्नानांच्या दिवसांसह प्रमुख स्नानांच्या दिवशी संगमक्षेत्री, तसेच प्रयागराज शहरात येऊ नये, असे आवाहन उत्तरप्रदेश सरकारच्या अनुपालन समितीने महनीय आणि अतीमहनीय व्यक्ती यांना केले आहे. सुरक्षा व्यवस्थेवर ताण येऊ नये, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. १३, १४ आणि २९ जानेवारी, तसेच ३, १२ आणि २६ फेबु्रवारी हे प्रमुख स्नानांचे दिवस आहेत. त्यामुळे १२ ते १५ जानेवारी, २६ ते ३१ जानेवारी, २ ते ४ फेब्रुवारी, ११ ते १३ फेब्रुवारी, तसेच २५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत महनीय आणि अतीमहनीय व्यक्तींनी न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.