प्रयागराज, ८ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभामध्ये प्लास्टिकचा उपयोग टाळण्यासाठी उत्तरप्रदेश शासनाने ‘प्लास्टिकमुक्त स्वच्छ कुंभ’ असे घोषवाक्य सिद्ध केले आहे. महाकुंभ क्षेत्र प्लास्टिकमुक्त व्हावे, यासाठी उत्तरप्रदेश शासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहेत आहे. यासाठी महाकुंभाच्या सर्व मार्गांवर प्लास्टिकचा उपयोग न करण्याविषयीचे फलक लावण्यात आले आहेत. चहासाठी प्लास्टिकचे कप वापरण्याऐवजी मातीचे कप (कुल्हड), प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या वापरण्याचे आव्हान करण्यात आले आहे. ‘प्लास्टिकला नाकारा, पर्यावरणाला अंगिकारा’, असे आवाहन फलकांद्वारे उत्तरप्रदेश शासनाकडून करण्यात आले आहे.