श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या अंबरनाथ तालुक्यातील धारकार्‍यांच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाचे अंबरनाथ तालुक्यातील सर्व धारकरी बंधू आणि भगिनी यांनी पूजन करून वंदन केले.

१ ते ९ मार्च कालावधीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार !

मनसे ‘मराठा राजभाषा’ दिवस सण आणि उत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा करणार आहे.

राजौरी (जम्मू) येथे मंदिराजवळ स्फोट !

श्री कालकामाता मंदिराला लक्ष्य करून करण्यात आलेल्या स्फोटामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.

(म्हणे) ‘श्रीक्षेत्र माहूर येथील रेणुकादेवी मंदिरात महिला पुजारी नेमावा !’ – तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड

धर्मांधांकडून लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदु मुलींवर होणारे अत्याचार, महिलांवरील बलात्कार आदी दूर करण्यासाठी यांनी कधी आवाज उठवला आहे का ? यावरून स्त्रीमुक्ती, महिला सक्षमीकरण आदी मागण्या किती पोकळ आहेत, हेच दिसून येते !

नेताजी बोस यांच्या कार्यक्रमात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणे अयोग्यच ! – रा.स्व. संघ

ज्या लोकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या ते नेताजींचाही सन्मान करत नाहीत आणि त्यांना ‘श्री रामा’विषयीही आस्था नाही. या प्रकरणामध्ये घोषणा देणार्‍या व्यक्तींचा शोध घेताला जावा, अशी मागणी संघाने भाजपकडे केली आहे.

(म्हणे) ‘मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा !’ – कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी

मुंबईचा आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा काहीही संबंध नसतांना वडाची साल पिंपळाला लावण्याचा प्रयत्न कर्नाटकचे उपमुख्यमंत्री करत आहेत, हेच स्पष्ट होते ! जर सीमावादातील भाग वादग्रस्त आहे, तर तो केंद्रशासित करण्यास काय अडचण आहे ?

१८० भ्रष्टाचारी देशांच्या सूचीमध्ये भारत ८६ व्या क्रमांकावर !  

भारतात भ्रष्टाचार्‍यांवर कठोर कारवाई होत नाही , ही स्थिती हिंदु राष्ट्रातच पालटली जाईल !

प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हावे, असे अनेक घटकांचे मत ! – शासन नियुक्त भास्कर नायक समितीचा अहवाल

भाषांतर म्हणजे धर्मांतर आणि धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर हे शासनाने लक्षात घेऊन त्वरित प्राथमिक शिक्षण तरी मातृभाषेतूनच देण्यास प्रारंभ करावे !

देहली पोलिसांकडून शेतकरी नेत्यांच्या विरोधात ‘लूकआऊट’ नोटीस जारी !

देहली पोलिसांकडून २० हून अधिक शेतकरी नेत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. यासह शेतकरी नेत्यांची पारपत्रे जप्त करण्याची कारवाईही चालू केली जाणार आहे.

देवतांचा अवमान करणार्‍या मुनव्वर फारूकी याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

देवतांचा अवमान केल्याच्या प्रकरणी खटला जलद गती न्यायालयात चालवून कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !