पंतप्रधान मोदी यांच्याकडून ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाचे कौतुक !
नवी देहली : गुजरातमधील वर्ष २००२ च्या दंगलीवर आधारित ‘द साबरमती रिपोर्ट’ प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाविषयी पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून म्हटले की, ‘सत्य समोर येत आहे, ही चांगली गोष्ट आहे. सामान्य लोकही ते पाहू शकतील. बनावट गोष्टी काही काळासाठी दाखवता येतात; पण तथ्ये नेहमीच बाहेर येतात.’
Well said. It is good that this truth is coming out, and that too in a way common people can see it.
A fake narrative can persist only for a limited period of time. Eventually, the facts will always come out! https://t.co/8XXo5hQe2y
— Narendra Modi (@narendramodi) November 17, 2024
मोदी यांनी आलोक भट्ट नावाच्या पत्रकाराची ‘एक्स’ पोस्ट शेअर केली आहे. यात चित्रपटाचा लघुपट (ट्रेलर) जोडण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये चित्रपटाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. ‘हा चित्रपट का पहावा ?’ हे या पोस्टमधून सांगण्यात आले आहे. पंतप्रधान यांनी यापूर्वी ‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटांचे कौतुक केले होते.