शिमला (हिमाचल प्रदेश) – येथे रामकृष्ण मिशन आश्रमाचे अनुयायी आणि ब्रह्म समाज यांच्यात हाणामारी झाली. यात पोलिसांसह अनेक जण घायाळ झाले. ही घटना भूमीच्या वादातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सध्या येथील परिस्थिती तणावपूर्ण आहे. येथे मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
ब्रह्म समाजाचे अनुयायी प्रथम रामकृष्ण मिशनच्या आश्रमात पोचले. तेथे त्यांचा रामकृष्ण मिशनच्या अनुयायांशी वाद झाला. नंतर एका बाजूने दुसर्या बाजूने खुर्चीद्वारे आक्रमण केले. यामुळे दोन्ही बाजूंनी एकमेकांवर भांडी आणि दगड यांद्वारे आक्रमण केले. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांवरही दगडफेक केली. मंदिराची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील कारवाई चालू केली आहे.
संपादकीय भूमिकाहिंदू, त्यांच्या संघटना आणि संप्रदाय यांच्यामध्ये संघटितपणा असणे आवश्यक असतांना अशा कारणांवरून वाद होणे हिंदूंसाठी धोकादायक ! |