श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या अंबरनाथ तालुक्यातील धारकार्‍यांच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

बदलापूर येथील कात्रप भागातील जिजामाता यांचे स्मारक

ठाणे – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या अंबरनाथ तालुक्यातील धारकार्‍यांच्या वतीने २८ जानेवारी (पौष पौर्णिमा) या दिवशी सकाळी ९ वाजता राजमाता जिजाऊ यांची जयंती बदलापूर येथील कात्रप भागातील जिजामाता यांच्या स्मारकाजवळ साजरी करण्यात आली. त्या वेळी अंबरनाथ तालुक्यातील सर्व धारकरी बंधू आणि भगिनी यांनी स्मारकाचे पूजन करून वंदन केले.