|
मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १२ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने स्वत:च्या एक्स खात्यावर संदेश प्रसारित केला आहे. यामध्ये ‘बाळासाहेब ठाकरे यांची १२ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त मला त्यांची आठवण येत आहे. माझे विचार आणि संवेदना उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरे, तसेच संपूर्ण शिवसेना कुटुंबासह आहेत’, असे लिहिले आहे.
Remembering Balasaheb Thackeray ji on his 12th death anniversary. My thoughts are with Uddhav Thackeray ji, Aditya and the entire Shiv Sena family.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 17, 2024
यात राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा नामोल्लेख करतांना ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणायचे टाळले आहे. हा संदेश पाठवतांना राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र घेतलेले नाही किंवा त्यांना अभिवादनही केलेले नाही. यावरून राहुल गांधी यांच्यावर टीका केली जात आहे.
राहुल गांधी यांच्या या संदेशावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना अनेकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचे जुने व्हिडिओ प्रसारित केले आहेत. यामध्ये ‘मी शिवसेनेची काँग्रेस कधीही होऊ देणार नाही’, या बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ पाठवण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससमवेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटही महाविकास आघाडीमध्ये असल्यामुळे राहुल गांधी यांनी हा संदेश प्रसारित केला असल्याचे म्हटले जात आहे.