देवतांचा अवमान करणार्‍या मुनव्वर फारूकी याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

अशांवरील खटला जलद गती न्यायालयात चालवून कठोर शिक्षा होण्यासाठी आता सरकारने प्रयत्न करावेत !

मुनव्वर फारूकी

इंदूर (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपिठाने हिंदूंच्या देवतांचा अवमान केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेला विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

न्यायालयाने म्हटले की, आतापर्यंत गोळा करण्यात आलेल्या पुराव्यावरून लक्षात येते की, फारूकी याने जाणीवपूर्वक लोकांच्या धार्मिक भावना कार्यक्रमाद्वारे दुखावल्या आहेत.